आजपासून रायगड चॅम्पियन्स क्रिकेट लीग

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड क्रिकेट आणि वेलफेअर असोसिएशनतर्फे जेएनपीटी मैदान उरण येथे रायगड चॅम्पियन्स क्रिकेट लीग (आरसीसीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खेळविण्यात येणार्‍या या स्पर्धेचे शुक्रवारी (दि.29) उद्घाटन होणार असून जिल्ह्यातील 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 285 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून 160 खेळाडूंची निवड करण्यात आली. या खेळाडूंमधून आठ संघ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात 20 खेळाडू असतील. आयपीएलच्याधर्तीवर ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. रणजीपटू योगेश पवार, भरत सोलंकी यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. 19 वर्षाखालील 2, 25 वर्षांखालील 3 व खुल्या गटातील 6 असे 11 खेळाडू प्रत्येक संघात असतील.

22 दिवस ही स्पर्धा खेळली जाणार आहे. न्युट्रल अंपयार, मॅचरेफ्री, थर्ड अंपयार, खेळाडूंसाठी रंगित गणवेश, स्नॅक्स, पीगपाँग एंटरटेमेंटकडून सामन्यांचे प्रक्षेपण ही स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत. आज सकाळी 11 वाजात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) उरण येथील मैदानवर स्पर्धेचे उद्घाटन होईल. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्यध्यक्ष प्रदीप नाईक तसेच इतर पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली अरसीसीएलचे सर्व सदस्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version