रायगड राजे संघ अजिंक्य
। उरण । वार्ताहर ।
रायगड क्रिकेट स्पोर्ट्स अँड वेल्फेअर असोसिएशन आयोजित जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत रायगड जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासात सर्वप्रथम कॉर्पोरेट लेव्हलची व्यवसायिक रायगड क्रिकेट चॅम्पियन लीग 2022 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता व जिल्ह्यातील 160 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेच्या मुख्य उद्देश रायगड जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे त्यांच्या क्रिकेट खेळायला प्रोत्साहित करणे प्रशिक्षित करणे व त्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जेएनपीटी ग्राउंड येथे संपन्न झाली. ही स्पर्धा 29 एप्रिल ते 18 मे पर्यंत खेळविण्यात आली. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार संघ पात्र ठरले रायगड राजे, कपिल पँथर यामध्ये प्रथम उपांत्य फेरीचा सामना खेळविण्यात आला. यामध्ये रायगड राजे विजय होऊन अंतिम सामन्यासाठी पात्र झाला तर दुसरा उपांत्य सामना समर्थ विंधणे व पनवेल सुपर स्ट्रायकर यांच्यामध्ये रंगला. त्यात समर्थ विंधणे संघ विजयी होऊन अंतिम सामन्यात प्रवेश केला.
अंतिम सामना रायगड राजे व समर्थ विंधणे यामध्ये खेळविण्यात आला. यात रायगड राजे संघ अजिंक्य ठरला. या स्पर्धेसाठी विविध मान्यवरांनी भेट दिली. यात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, मा.आ.मनोहर .भोईर, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम पाटील, जे.बी.मोरे मॅनेजर जेएनपीटी, चंद्रकांत मते उपाध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रदीप नाईक, कार्याध्यक्ष रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रशांत ओक, दिनेश लाड, प्रशिक्षक रोहित शर्मा व शार्दुल ठाकुर, विवेक बहुतुले आदी मान्यवरांनी स्पर्धेला उपस्थिती लावली होती.
या स्पर्धेत सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये व्हिडिओ एनालिसेस तंत्राचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी बीसीसीआयचे व्हिडिओ एनालिस्ट प्रधान, सागर यांनी काम पाहिले. या स्पर्धेचं लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. मॅच रेफ्रीच काम चंद्रकांत म्हात्रे यांनी तर ग्राऊंडमेनचे काम संजय पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी पाहिले. तसेच या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सागर मुळे तर उत्कृष्ट फलंदाज ओमकार गावडे, उत्कृष्ट गोलंदाज समर्थ कडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक योगेश पवार, इमर्जिंग प्लेयर विशेष पुरस्कार अंडर 16 चा तेजस मोहिते यांची निवड करण्यात आली.