। मुंबई । प्रतिनिधी ।
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर आरोपींनी सलमान खानच्या घराजवळ गोळीबार करण्यासाठी वापरलेली बाईक ही रायगडमधील असल्याची माहिती आहे. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून, त्यांचा शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोराचा फोटो समोर आला आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी हल्लेखोरांनी बाईक खरेदी केली होती. या दोन्ही आरोपींनी रायगड जिल्ह्यातून जुनी बाईक खरेदी केली होती, असे तपासात समोर आले आहे. ही सेकंड हँड खरेदी केलेली बाईक घेऊन आरोपी मुंबईत दाखल झाले आणि गोळीबार केला. पोलिसांनी आता या बाईकच्या खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत सहभागी असणार्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. या व्यवहारातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, त्यातून आरोपींपर्यंत पोहोचता येईल का, हे तपासात स्पष्ट होईल.