जिल्ह्यात 99 कोरोना रूग्ण

327 रुग्णांवर उपचार सुरू; 40 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात पनवेल मनपा सह, पनवेल ग्रामीण, उरण, पेण, अलिबाग, तळा या 5 तालुक्यामध्ये तब्बल 99 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला असून तर दिवसभरात 40 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

बुधवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 72, पनवेल ग्रामीण 17, उरण 1, पेण 6, अलिबाग 2, आणि तळा 1 असे 99 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 18, पनवेल ग्रामीण 14, उरण 1, खालापूर 1, पेण 2, अलिबाग 2, मुरुड 1 अशा एकूण 40 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 916 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 891 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 इतका आहे. सद्यस्थितीत 327 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version