61 नवीन रूग्ण, 6 कोरोना मुक्त; जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात पनवेल मनपा सह, पनवेल ग्रामीण, पेण, रोहा आणि अलिबाग तालुक्यामध्ये एकूण 61 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 234 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला असून तर दिवसभरात 6 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रविवारी जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 36, पनवेल ग्रामीण 8, पेण 5, अलिबाग 11 आणि रोहा 1 असे 61 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 4 तर रोहा 2 अशा एकूण 6 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 724 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 792 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर गेला आहे. सद्यस्थितीत 234 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.