जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये तब्बल 205 कोरोना रुग्ण

951 रुग्णांवर उपचार सुरू
108 रुग्ण कोरोनामुक्त जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शनिवारी रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 15 तालुक्यांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात तब्बल 205 रुग्णांची नोंद झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात 951 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून, दिवसभरात 108 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील पनवेल मनपा क्षेत्रात 115, पनवेल ग्रामीण 35, उरण 3, खालापूर 6, कर्जत 6, पेण 9, अलिबाग 11, मुरुड 2, माणगाव 3, तळा 1, रोहा 3, सुधागड 1, श्रीवर्धन 1, म्हसळा 3, पोलादपूर 2 आणि महाड 4 असे 205 रुग्ण आढळले. तर पनवेल मनपा क्षेत्रातील 74, पनवेल ग्रामीण 24, उरण 1, खालापूर 2, कर्जत 4, माणगाव 2, श्रीवर्धन 1 अशा एकूण 108 रुग्णांना बरे वाटल्याने कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 17 हजार 408 झाली आहे. यापैकी 2 लाख 11 हजार 757 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. उपचारादरम्यान 4 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 951 रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version