जिल्ह्यात तीन नवे कोरोना रूग्ण; दोन कोरोनामुक्त

52 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सोमवार दि. 18 एप्रिल रोजी कोरोनाच्या तीन नव्या रुग्णाची नोंद झाली नसून दोन रूग्ण कोरोना मुक्त झाले. सद्यस्थितीत 52 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

सोमवारी पनवेल मनपा क्षेत्रात तीन नवे रूग्ण आढळले. तसेच पनवेल मनपा व श्रीवर्धन येथील प्रत्येकी एक असे दोन रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 328 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 578 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर गेला आहे. सद्यस्थितीत 52 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version