रायगड जिल्ह्यात तीन कोरोना रूग्ण

दोन कोरोनामुक्त, 59 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात शनिवार दि. 7 मे रोजी कोरोनाच्या तीन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 59 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

आज पनवेल मनपा हद्दीत दोन तर पनवेल ग्रामीण मध्ये एक असे तीन नवीन रूग्ण आढळले आहेत. तसेच पनवेल मनपा आणि रोहा तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 376 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 619 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर थांबला आहे. सद्यस्थितीत 59 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Exit mobile version