| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचा 23 वर्षांखालील मुलांचा क्रिकेट संघ निवडण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे दि.26 व 27 एप्रिल रोजी उरण येथील भेंडकळ क्रिकेट अकॅडमी येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे 23 वर्षाखालील मुलांची आमंत्रितांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेले 1 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 या कालावधीत जन्मलेले खेळाडू या निवड चाचणीसाठी पात्र असणार आहेत. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आपल्या आधार कार्डची स्वतःची सही केलेली झेरॉक्स प्रत व मूळ आधार कार्ड, स्वतःचे 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो व जन्म दाखला तसेच, निवड चाचणी शुल्क 200 रुपये असून क्रिकेटच्या पांढरा पोशाख परिधान करून स्वतःच्या क्रिकेट किटसह खेळाडूंनी सकाळी 8.30 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत ओक 9822422676, चंद्रकांत मते 098228 36442 यांच्याशी संपर्क साधावा.





