विश्वकर्मा सुतार चॅरिटेबल ट्रस्टची रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर


| नेरळ | वार्ताहर |

विश्वकर्मा सुतार समाज संघटनेचे कार्य करणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टची रायगड जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यासाठी राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रायगड जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. श्रीविश्वकर्मा समाज महाड तालुका अध्यक्ष लहू काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून विश्वकर्मा सुतार चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्षा ॲड. कांचन सुतार वाळवेकर, सचिव विठ्ठल जानेकर, खजिनदार राजेंद्र सुतार, राज्य कार्यकारिणी सदस्य रविराज महामुनी आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी दिलीप पांचाळ यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारिणी जयराम सुतार महाड यांची रायगड जिल्हा अध्यक्ष, दत्ता सुतार म्हसळा यांची जिल्हा उपाध्यक्ष, अरुण नाकरेकर कर्जत यांची जिल्हा सेक्रेटरी, राजू शांताराम सुतार माणगाव यांची खजिनदार, रमण धामणस्कर खोपोली, विकास सुतार महाड आणि रमाकांत रोडेकर पेण यांची सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली. बैठकीचे आयोजन संघटनेचे कार्यकर्ते अनिल गोलीपकर रोहा, नामदेव सुतार रोहा, विजय सुतार खोपोली, संतोष मालगुंडकर कर्जत, मंगेश नाकरेकर तळा, महेंद्र महाडकर तळा, राजु रोडेकर माणगाव, प्रदीप पांचाळ पेण, राजेंद्र सुतार महाड आणि संदीप नथूराम सुतार अलिबाग यांची नियुक्ती करण्यात आली.

Exit mobile version