। खोपोली । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषद खोपोली शाखेच्या अध्यक्षपदी साहित्यिका उज्ज्वला दिघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिघे यांनी 2022 ते 2024 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये प्रकाश राजोपाध्ये उपाध्यक्ष, बालविभाग प्रमुख, सुधा इतराज उपाध्यक्षा, वामनराव दिघे कोषाध्यक्ष, नरेंद्र हर्डीकर कार्याध्यक्ष, जयश्री पोळ सचिव, निशा दळवी सहसचिव, रेखा कोरे जिल्हा प्रतिनिधी, अनिलकुमार रानडे कार्यकारिणी सदस्य, मोहिनी गुरव कार्यकारिणी सदस्या, मधुमिता पाटील कार्यकारिणी सदस्या, वैशाली मोरे कार्यकारिणी सदस्या, उल्हासराव देशमुख सल्लागार, सूर्यकांत सरोदे सल्लागार, डॉ. भाऊसाहेब नन्नावरे सल्लागार, दत्तात्रेय मसुरकर साहित्यमित्र व हितचिंतक यांचा समावेश आहे.