रायगड जिल्हा किक बॉक्सिंग संघ घोषित

नगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 55 खेळाडूंचा समावेश
| वेणगाव | वार्ताहर |
रायगड जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेच्या वतीने 1 ऑगस्टपासून अहमदनगर येथे होणार्‍या पहिल्या सिनियर आणि मास्टर्स राज्यस्तरिय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी रायगड जिल्हा किक बॉक्सिंग संघात 55 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

या सर्व खेळाडूंना होणार्‍या स्पर्धेसाठी भरीव कामगिरी करता यावी व खेळाडूंनी राज्यात चमकावे म्हणून रायगड जिल्हा किक बॉक्सिंग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा राजिपचे उपाध्यक्ष व आरोग्य, शिक्षण, क्रीडा सभापती सुधाकर घारे यांनी कर्जत दहिवली येथील राष्ट्रवादी भवनच्या हॉलमध्ये नगर येथे किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी जाणार्‍या खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्याच्या समारंभाच्या कार्यक्रमात सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी किक बॉक्सिंग प्रशिक्षक जीवन ढाकवळ, व्यवस्थापक संदीप आगीवले, तसेच अशोक भोपतराव आदी मान्यवर उपस्थित होते. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सौरभ नवले, ऐश्‍वर्या सुळे, अंजली येवले, अपूर्वा ठोंबरे, आशा खरात, दक्षता उबरकर, धनश्री जोशी, धृपदा जामधडे, हर्षदा शिंदे, जया शिंदे, रुपाली पेमारे, पूजा दांडेगावकर, प्रगती पाटील, रसिक डुकरे, रोहिणी मोडक, शलाका देशमुख, सुमित्रा सावंत, वर्षा मते, विशाखा गंगावणे, योजना दिसले, आदेश जाधव, आकाश विरले, भूषण बेडेकर, भूषण गायकवाड, जितेश मालुसरे, कल्पेश दुर्गे, मनोहर पारधी, कल्पेश पोतदार,अमित बोसाख, अजदाबू अन्सारी, भावेश घरत, मयुरेश बदे, नयन मते, निखिळेश बार्शी, निलेश पादीर, निशांत जोशी, नितेश मसने, प्रथम गुरव, प्रथमेश बदे, प्रतीक म्हसे, राज घरत, रोहन गुरव, रोहित तुपे, ऋषीकेश बदे, सचिन सानप, शेखर पार्टे, सिद्धार्थ चव्हाण, विनायक कदम, वीरेंद्र देवरे, विशाल भगत, यश भोज, योगेश जाधव, युवराज धुळे इत्यादी खेळाडूंचा समावेश असून, राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ हा 26 ते 29 ऑगस्टदरम्यान गोवा येथे होणार्‍या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार करणार आहेत.

Exit mobile version