पीएनपीच्या विद्यार्थांची रायगड जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवड

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पीएनपी होली चाईल्ड स्कूल वेश्वी अलिबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. 14 वर्षा खालील मुली प्रथम क्रमांक, 14 वर्षा खालील मुले, द्वितीय क्रमांक, 17 वर्षा खालील मुली द्वितीय क्रमांक पटकावला, या सर्व विद्यार्थांची रायगड जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, होली चाईल्ड एस. एस. सी. बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले व उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे, क्रीडा मार्गदर्शक अक्षय डाकी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version