रायगड जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन स्पर्धा

पेण फोटोग्राफर्सने पटकाविला प्रथम क्रमांक

| अलिबाग | प्रतिनिधी |

फोटोग्राफीच्या व्यस्त कामातून वेळ काढून मनावरील ताण कमी करण्यासाठी त्याचबरोबर सर्वानी एकत्र येण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने अलिबाग नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर मर्यादीत षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या सम्पूर्ण स्पर्धेचे अलिबाग फोटोग्राफेर्स असोसिएशनने दिमाखदार नियोजन केले होते. या स्पर्धेत पेण अ फोटोग्राफर्स संघ प्रथम क्रमांक, कर्जत फोटोग्राफर्स व्दितीय क्रमांक, रोहा फोटोग्राफेर्स तृतीय क्रमांक तर पेण ब फोटोग्राफर्स संघाला चौर्था क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेत अष्टपैलू खेळ करून दाखवित पेण अ संघाच्या विनोद बामुगडेने मालिकावीर होण्याचा मान पटकाविला. कर्जत संघाच्या आकाश कोळंबेने उत्कृष्ट फलदांजाचे पारितोषिक पटकाविले तर रोहा अ संघाच्या निलेश टवळे याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे औचित्य साधून फोटोग्राफेर्सच्या क्रिकेट स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या दिवंगत फोटोग्राफर्स कै. इर्शाद कप्तान यांची पत्नी साजिया कप्तान आणि कै. अमित पिसाट यांच्या पत्नी शिल्पा पिसाट यांचा अलिबाग फोटोग्राफेर्स असोसिएशनच्या वतीने गौरव करण्यात आला. स्पर्धेला शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे कौतुक करीत प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी अशाप्रकारचे क्रिकेट किंवा इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतल्याने आपल्या कामावरील ताण कमी होण्यास मदत होईल असेही सांगितले. एक फोटो 1000 शब्द सांगून जातो, त्यामुळे फोटोग्राफीला खूप महत्व असल्याने पुढील काळात फोटोग्राफर्सना रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित फोटोग्राफर्सना दिले.

सामन्यांचे उद्घाटन अँड. प्रवीण ठाकूर, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा ऍड. मानसी म्हात्रे, मुंबई येथील राहूल सेल्सचे मालक हरिषभाई शहा, फोटोग्राफेर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभेकर, वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, काँग्रेसचे उपाध्यक्ष राजा ठाकूर, खंडाळे ग्रामपंचायत सरपंच नाशिकेत कावजी, राष्ट्रवादी काँग्रेस चे ऋषिकांत भगत, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉ. गणेश गवळी, डॉ. राजाराम हुलवान यांनी या स्पर्धेला भेट दिली. या स्पर्धेत रायगड जिल्हातील अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत, रोहे, पाली, नागोठणे, पोयनाड, खोपोली आणि मिक्स इलेव्हन अशा 13 संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अलिबाग मधील पत्रकार आणि अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन यांच्यात प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला.

विजेत्यांना अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सी.ए. संजय राऊत, रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल मोरे, सासवणे ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील, रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, सहसचिव दीपक बडगुजर, खजिनदार जितेंद्र मेहता, कार्यकारिणी सदस्य अविनाश राऊत, निलेश शिर्के, सुशील घाटवळ, अलिबाग फोटोग्राफेर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सुदेश माळी, अमोल नाईक, प्रणेश म्हात्रे सुबोध घरत, सचिन म्हात्रे, सचिन आसराणी व इतर सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version