| गडब | वार्ताहर |
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएन शिवराज प्रतिष्ठान, झंकार ग्रुप बिरवाडी, विकासशेठ मित्रमंडळ ढालकाठी यांचे विद्यमाने बिरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा अंजिक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मिडलाईन कर्जत संघाने अंजिक्यपद मिळविले.
या स्पर्धेत अंतिम सामना मिडलाईन कर्जत विरुध्द नवतरुण क्रिडा मंडळ कारावी यांच्या मध्ये झाला अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मिडलाईन कर्जत संघाने नवतरुण कारावी संघाचा पराभव करुण अंजिक्यपद मिळविले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिडलाईन कर्जत, व्दीतीय क्रमांक नवतरुण कारावी, तुतीय क्रमांक जय हनुमान चरी, चतुर्थ क्रमांक जय बजरंग बेली या संघाना मिळविले.
या स्पर्धेला पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, विकास गोगावले आदि मान्यवरांनी भेट देवुन खेळांडुना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 192 संघानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतुन रायगड जिल्ह्याचा राज्य अंजिक्यपद स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेसाठी राज्य कबड्डी असोसिएशनकडुन मिनानाथ धानजी हे निरिक्षक होते.