रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 272.50 मीमी पावसाची नोंद

जिल्ह्यात सर्वाधिक नोंद पनवेलमध्ये झाली आहे

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

 रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 272.50 मीमी पावसाची नोंद झाली असून सरासरी 17.03 मीमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पनवेल 80.60 मीमी, त्याखालोखाल माथेरान 42.30 सर्वात कमी श्रीवर्धन तालुक्यात 1.00 मी.मी पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग, पनवेल,  कर्जत,  खालापूर उरण तालुक्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने हाजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांनाही वेग आलेला आहे. अतिवृष्टीमुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद असून बाजारात खाडीतील मासे उपलब्ध करुन देण्यासाठी मच्छामार आता खाडीमध्ये धाव घेत आहेत.

पावसाने दोन दिवसापुर्वी रायगडातील काही भागामध्ये हजेरी लावली. मागील सात दिवसापासून पडणाऱ्या कडक उन्हामुळे सर्व जण हैराण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत आहे परंतु पाऊस काही पडत नव्हता. अलिबाग, महाड, पोलादपूर, उरण, माणगाव, पेण, तळा या भागांत सतत पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे येथील नागरीकांना अनेक समस्यांनाहि सामोरे जावे लागले होते. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
पितृपक्षा मुळे सध्याचे दिवस हे उपवासाचे असल्याने नागरीक फळ-फुल व भाजी घेण्यास मार्केटमध्ये फिरत असतात. मात्र पावसामुळे भाजी-फळ विक्रेत्यांना सर्वात मोठा फटका बसला. सकाळी बाजारात भाजी विक्री करायला आलेल्या भाजी विक्रेत्या महीलांना ग्राहकांची वाट पहावी लागली. तर फळ विक्रेत्यांना ही ग्राहकांच्या प्रतिक्षा होती.

जिल्ह्यातील एकूण पाऊस
अलिबाग- 5.00 मि.मी., पेण- 12.00 मि.मी., मुरुड- 6.00 मि.मी., पनवेल- 80.60 मि.मी., उरण-14.00 मि.मी., कर्जत- 25.60 मि.मी., खालापूर- 22.00 मि.मी., माणगाव- 0.00 मि.मी., रोहा- 16.00 मि.मी., सुधागड-10.00 मि.मी., तळा-2.00 मि.मी., महाड- 7.00 मि.मी., पोलादपूर-11.00 मि.मी, म्हसळा- 18.00 मि.मी., श्रीवर्धन-1.00 मि.मी., माथेरान- 42.30 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 272.50 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 17.03 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 106.96 टक्के इतकी आहे.  

Exit mobile version