पुरूष कबड्डी स्पर्धेला पेझारी , भेंडखळ येथे प्रारंभ
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पुरूष गटाच्या अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 15 ते 17 डिसेंबर या कालावधीत चार ठिकाणी खेळली जाणार आहे. बुधवारी (दि. 15 ) पेझारी व भेंडखळ येथे या स्पर्धेला प्रारंभ झला. या स्पर्धेत 256 संघ सहभागी झाले आहेत. 17 डिसेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील सहाण येथे अंतिम फेरी खळली जाणार आहे.
जिल्ह्यातील 256 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. चार गटांतील सामने चार ठिकाणी खेळवले जाणार आहेत. 15 डिसेंबर रोजी 1 ते 64 संघांचे सामने भैरवनाथ क्रीडा मंडळ यांच्या यजमानपदाखाली पेझारी तालुका अलिबाग येथे तर 65 ते 128 संघांचे सामने नवकिरण क्रीडा मंडळ भेंडखळ तालुका उरण येथे खेळले जाणार आहेत. 16 डिसेंबर रोजी 129 ते 192 क्रमांकाचे सामने जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्या यजमानपदाखाली अलिबाग तालुक्यातील साहण येथे तर 193 ते 256 क्रमांकाचे सामने गावदेवी क्रीडा मंडळ मुढाणे तालुका पेण यांच्या यजनमानपदाखाली खळवले जाणर आहेत.
चार ठिकाणी खेळल्या जाणार्या चार गटांच्या सामन्यांमधून पहिले चार क्रमांकांचे संघ निवडले जातील. चार गटातून आलेल्या अव्वल 16 संघांचे सामने 17 डिसेंबर रोजी सहाण, तालुका अलिबाग येथे खेळवीले जातील. त्यातून विजेता संघ ठरेल. या स्पर्धेतील खळाडूंची कामगिरी पाहून रायगड जिल्हा पुरूष कबड्डी संघ निवडण्यात येईल. हा संघ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सहभागी होईल.