रायगड जिल्हा वरिष्ठ गट क्रिकेट निवड चाचणी भेंडखळ येथे

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे वरिष्ठ गटाची निवड चाचणी शिबिर 18 व 19 जानेवारी रोजी उरण-भेंडखळ येथील ठाणकेश्वर मैदान येथे आयोजीत करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा स्पर्धा यापूर्वी जाहीर करण्यात आली होती परंतु महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आमंत्रितांची स्पर्धा 24 जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नाही. त्यामुळेरायगड जिल्हा वरिष्ठ गटाचा संघ निवडण्यासाठी दोन दिवसीय निवड चाचणी आणि काही सराव सामने खेळवून त्यातून रायगडचा संघ निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वरिष्ठ गटाची स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात खेळविण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली.

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे 18 व 19 जानेवारी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीत रायगड जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या खेळाडूलाच सहभागी होता येईल. शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजता, आपल्या क्रिकेट किटसह क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात येणे अनिवार्य आहे. खेळाडूंनी येताना सोबत आपल्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे.

निवड चाचणीसाठी प्रवेश शुल्क रुपये दोनशे आहे. या दोन दिवसीय शिबिरातून, निवडण्यात येणाऱ्या खेळाडूंचे संघ तयार करून त्यांचे काही सराव सामने खेळण्यात येतील व त्यातून रायगडचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे होणाऱ्या आमंत्रिताच्या स्पर्धेसाठी निवडला जाईल. अधिक माहितीसाठी प्रशांत ओक 9822422676, संदीप पाटील- 099205 48181, 083697 89385 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version