| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई जिल्हा थाई बॉक्सिंग संघटना आणि राजू थाई बॉक्सिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून मुंबई विभागीय थाई बॉक्सिंग स्पर्धा मुंबईतील चेंबूर येथील महापालिका शाळेत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मुंबईसह पाच जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी मुंबई विभागीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने तिसरे स्थान पटकावले आहे.
या स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच, नाशिक येथे होणाऱ्या राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपली निवड कायम ठेवली आहे. यावेळी रायगड संघांमधील दिशा शेळके, मयुरी देवळे, अजित सुपे, गार्गी खोकले, वेदा गवळी, निसर्गा गवळी, खुशबू द्विवेदी, मोक्षित डबेकर, वेदिका पेरणे, काव्या पेरणे व विनंती खडके या सर्व खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळविले आहे. सौरभ गुरव, माही चौहान, कार्तिक मेत्रे, गायत्री डामसे, सुशांत कान्हट यांनी रौप्यपदक मिळविले आहे. तर, जय डामसे, विहान पेरणेकर, वैदेही जाधव, दिशांत भोईर, आयुष अस्वले यांनी कांस्यपदक पटकावले आहे. या सर्व खेळाडूंना रायगड जिल्हा सचिव स्वप्निल अडूरकर, मोहिनी अडूरकर व सौरभ गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.







