जिल्हाधिकारी यांचे आदेश लागू
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
कारोनाला आळा घालण्यासाठी शासन सर्व स्तरातून प्रयत्न करीत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे लक्षात येताच . राज्य सरकारने अनलॉक करण्यास सुरुवात केली. यासाठी जिल्हानिहाय परिस्थिती पाहता टप्प्यांत अनलॉक करण्याचा निर्णय घेतला. रायगड जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्ह्याचा पाचव्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. मात्र काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर खाली येत असल्याने जिल्ह्याचा तिसर्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून सर्व दुकाने सुरु करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत. तसेच अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 परंत सुरु राहतील पण शनिवार आणि रविवार ही दुकाने पूर्णतः बंद राहतील.




