रायगड डायनमोझ पेझारीच्या गोलंदाजांची उल्लेखनीय कामगिरी ; ऑल आऊट -२५ धावा

| अलिबाग | सायली पाटील |
रायगड डायनमोझ पेझारीच्या गोलंदाजांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रायगड डायनमोझ पेझारी संघाच्या श्रीकांत मोलगी या गोलंदाजाने कमालीची खेळी करत सामन्याला सुरूवात होताच पहील्याच षटकामध्ये चार चेंडूतच आर एम सप्लायर्स झिराड संघाच्या ३ फलंदाजांना बाद केले. प्रमोद पाटील या गोलंदाजाने २ गडी बाद केले. त्यानंतर लागोपाठ श्रीकांत मोलगीने पुन्हा एकदा २ विकेट्स घेतल्या. किशोर नाईकने चौथ्या षटकात १ गडी बाद केला. तर लगेचच जयेश या गोलंदाजाने शेवटच्या षटकात शेवटचा गडी बाद केला. अशा प्रकारे पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तशा धडाधड तशा धडाधड विकेट्स रायगड डायनमोझ पेझारीने आर एम सप्लायर्स झिराडला फक्त २५ धावा काढून देऊन ऑल आऊट केले.

Exit mobile version