| रायगड | प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्ययात आलेल्या 14 वर्षांखालील (सबज्युनियर) मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा क्रिकेट संघ कोल्हापूरला रवाना झाला. उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मैदानावर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे 14 वर्षांखालील (सबज्युनियर) मुलांची निवड चाचणी घेण्यात आली होती. यात 216 खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील 45 खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यांचे तीन संघ तयार करून त्यांच्यात रिलायन्स इंडस्ट्रीच्या नागोठणे येथील मैदानावर साखळी सामने खेळविण्यात आले. हे साने खेळविण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रिज नागोठणेच्या प्रशासनाने सहकार्य केले. या सामन्यांमधील कामगिरी पाहून रायगडचा संघ निवडण्यात आला.चंद्रकांत चौधरी, ॠषिकेश राऊत, अभिषेक खातू यांच्या निवड समितने संघ निवडला.
स्पर्धा व्यवस्थापक म्हणून प्रकाश पावसकर यांनी काम पाहिले. समन्वयक म्हणून संदीप पाटील यांनी काम पाहिले. यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, रिलायन्स स्पोर्टस सेक्रेटरी उदय दिवेकर, विश्वनाथ उतेकर, प्रतिम कैय्या उपस्थित होते. रायगड जिल्ह्याच्या युवराज चौधरी, पार्थ म्हात्रे, तनिष पुजारी यांची पश्चिम विभीय संघासाठी निवड करण्यात आली आहे.
रायगडचा संघ : पंकज इटकर (कर्णधार), अथर्व पाटील (उपकर्णधार) , तनिष्क जातुशकरण , आन्हिक मानकामे, आर्यन निकाळजे, अविघ्न गुंड, आशिर्व पाटील, पार्थ पवार (यष्टीरक्षक), साहिल पोपेटा, वेदांत कडू, सोहराब अन्सारी, आदित्य भारती, अजिंक्य कैय्या, भाविक पाटील. प्रशिक्षक व व्यवस्थापक : राहूल नवखारकर , राखीव : त्रिशांत सिंग, युवराज खिल्लारे, ओम सावंत , रिदम पाटील, मंत्र पाटील, अदिल हनुमन्ते, आयुष पाटील, पृथ्वीराज जवके. पश्चिम विभागसाठी : युवराज चौधरी, पार्थ म्हात्रे, तनिष पुजारी.