। अलिबाग । वार्ताहर ।
रायगडच्या लाठी खेळांडूची काठमांडू नेपाळ येथे होणार्या लाठी साऊथ एशिन स्पर्धेत भारतासाठी निवड झाली आहे. दि.27 ते 30 मे रोजी स्पर्धा पारपडणार आहेत. या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुले गटात शिवम गुंजाळ, प्रियेश मसाल 10 वर्षाखालील मुले गटात अंश म्हात्रे, मल्हार गुंजाळ, देवदत्त पडवळ 18 वर्षाखालील मुले गटात वेदांत सुर्वे आणि सिनिअर गटामध्ये शुभम नखाते आणि 14 वर्षाखालील मुली गटात स्नेहा मसाल, सृष्टी म्हामूणकर,नम्रता चव्हाण, साना तुळपुळे, लावण्या प्रविण भगत आणि सिनिअर गटामध्ये माही खमिस या खेळांडूची आणि कोच म्हणून प्रियंका गुंजाळ यांची निवड भारतासाठी झाली आहे. या सर्व खेळांडूचे रविंद्र नाईक, सचिन निकम, प्रफुल यांच्या हस्ते खेळाडूंचे सत्कार करण्यात आला.