रायगड मेडिकल असोसिएशन ई-बुलेटीन प्रकाशन सोहळा

| महाड | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या पवित्रदिनी ध्वजवंदन व राष्ट्रगान सोहळ्यानंतर जनकल्याण रक्त केंद्र महाड येथे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. फैजल देशमुख यांच्या हस्ते रायगड मेडिकल असोसिएशनचे अधिकृत त्रैमासिक ई-बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदेश पाथरे, उपाध्यक्ष व संपादक डॉ. राहुल सुकाळे. खजिनदार डॉ. दिनेश मेहता डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडचे अध्यक्ष डॉ. सचिन बुटाला, सेक्रेटरी डॉ. स्वप्निल जाधव, सहसेक्रेटरी डॉ. जितू पावरा, डॉ. सागर रहाळकर तसेच ज्येष्ठ डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, डॉ. राजीव गोखले, डॉ. सुनील नांदगावकर, डॉ. गणेश सोनावणे, डॉ. माधव पवार, डॉ. जितेंद्र खाजगीवाले, मोहन शेठ, रोहन शेठ, रक्तकेंद्र अध्यक्ष धनंजय परांजपे, शिवराज भागवत, माधव डाखवे आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजवंदन सोहळा पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर, डॉ. प्रमोदिनी बावस्कर, डॉ. सीमा रानडे, डॉ. सुजाता दाभाडकर, डॉ. नूतन सुकाळे, डॉ. चेतन सुर्वे, डॉ. सूर्यकांत शेठ व जनकल्याण रक्तकेंद्र व्यवस्थापक महेश मोरे, सर्व संचालक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

Exit mobile version