| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड मेडिकल असोसिएशन आणि कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन कर्जत नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने 79 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त कर्जत येथील शनी मंदिरात रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुळकर्णी आणि राकेश परमार यांच्या हस्ते झाले. यावेळी 250 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी सचिव डॉ. प्रशांत गांगल, खजिनदार डॉ. कुमार ओसवाल, डॉ. दिलीप सावळे, डॉ. मनीष परमार, डॉ. रितेश जैन, डॉ. राहुल ओसवाल, डॉ. प्रेमचंद जैन, मुकेश कटारिया, नरेंद्र बोराडे, रवींद्र हिंगाड आणि विजय मांडे उपस्थित होते. रक्तदान शिबिराची सुरुवात सतीश पिंपरे यांनी रक्तदान केले. पिंपरे यांनी 75 वे रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.







