आ. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथून प्रसिद्ध होणाऱ्या त्रैमासिक ‘रायगड मित्र’च्या चौदाव्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यादेखील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रायगड मित्रचे संपादक रायगड भूषण पत्रकार दीपक यशवंत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. यावेळी पेढांबे सरपंच राजेंद्र पाटील, सदस्य रुपेश पाटील, उदय पाटील, तुकाराम पाटील, प्रमोद पाटील, आर.बी. पाटील, गिरीश पाटील, ब्रम्हानंद पाटील, क्षितिज पाटील, श्रीकांत पाटील, व्ही.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थितत होते. या दिवाळी अंकाची निर्मिती, उत्कृष्ट मांडणी, माहितीपूर्ण लेखांची निवड याबद्दल शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील, जि.प. माजी सदस्या भावना पाटील, झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रा पाटीला, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी संपादक दीपक पाटील, मुखपृष्ठ चित्र अभिनेत्री अर्चना पवार पाटील आदींचे कौतुक केले.