एडलवाईजच्या संचालकांना रायगड पोलिसांची नोटीस

| रायगड | खास प्रतिनिधी |

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी इसीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकांना रायगड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. विविध मुद्द्यांवर संचालकांकडून माहिती मागवण्यात आली आहे. दि.8 सकाळी दहा वाजेपर्यंत खालापूर पोलीस ठाण्यात हजर राहून माहिती सादर करण्याचे फर्मान पोलीसांनी दिले आहे. कृषीवलने दि.4 जुलै रोजीच्या अंकामध्ये ‘ती कंपनी चौकशीच्या फेऱ्यात’ अशा आशयाचे वृत्त दिले होते. आता या सीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपच्या संचालकां विरोधात पाेलीसांचा फास आवळला आहे.

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्त्ये प्रकरणी खालापूर पोलीसांनी सीएल फायनान्स कंपनी/ एडलवाईज ग्रुपचे संचालक आणि प्रशासकावर गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याबाबत तक्रार दिली होती. आतापर्यंत पोलिसांनी 15 साक्षीदारांकडे विचारपूस केली आहे. तसेच, एनडी स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, अकाउंटन्ट आणि आर्थिक सल्लागार यांच्याकडून कर्ज प्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे.

दरम्यान, गुन्ह्याच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, तीन सहा पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले आहे.

Exit mobile version