। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
रायगड प्रीमियर लीगच्या वतीने रायगड जिल्ह्यातील मुलींसाठी पहिली विमेन्स क्रिकेट लिग स्पर्धा आयोजित केली आहे. सर्वत्र मुलांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या जातात पण मुलींसाठी लेदर बॉलवर क्रिकेट स्पर्धा होत नाहीत याची दखल घेत त्यांच्या खेळाला वाव मिळावा म्हणून रायगड प्रीमिअर लीगच्या वतीने मंगळवारी (दि. १० मे) एमडीएन फ्युचर स्कुल कोलाड येथे एक दिवसीय शिबीर व निवड चाचणी होणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व मुलींची निवड करून त्यांना विविध संघात समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. १५ मे ते २५ मे रोजी सिडको ग्राऊंड रायगड भवन, बेलापूर येथे विमेन्स प्रीमिअर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी रायगड प्रीमिअर लिगचे सदस्य संदीप जोशी ७४९९७७२४५३ यांच्याशी संपर्क साधावा व आपली नोंदणी करावी अशी माहीत रायगड प्रीमिअर लिगचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी दिली.
रायगड प्रीमिअर लिगतर्फे विमेन्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
