। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड प्रीमियर लीगकडून यावर्षी क्रिकेट खेळाडूंसाठी आणखी एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात टी-20 स्पर्धेचे आयोजन करणायचा निर्णय प्रीमियर लीग कमिटीने घेतला आहे.
रायगड प्रमियर लीग असोसिएशनकडून यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात भरगच्च स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्यातून तब्बल पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली. त्यामुळे रायगड प्रीमियर लीगबाबत सर्व खेळाडूंना उत्साह आहे. जिल्ह्यातील खेळाडू घडविण्यासाठी नियोजनबद्ध तयारी करणार्या रायगड प्रीमियर लीग असोशिएशनकडून क्रिकेट प्रसारासाठी टी-20 स्पर्धा आयोजित केली आहे. हि स्पर्धा डिसेंबर 2022 मध्ये होणार असून या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेची तयारी पुर्ण झाली असुन खेळाडुंची निवड प्रक्रिया आणि चषकांचे अनावरण एकाच दिवशी एकाच समारंभात होणार आहे.
या स्पर्धेसाठी बनविण्यात आलेल्या नियमावलीत सध्याच्या मोसमातील स्पर्धेमध्ये मागील स्पर्धेतील सहभागी संघांना प्राधान्य देण्यात येईल. संपूर्ण स्पर्धा मॅटिंग आणि टर्फ विकेटवर खेळविण्यात येईल. स्पर्धा अधिकृत व्यावसायिक पंचाच्या आणि गुणलेखकांच्या देखरेखखाली खेळविण्यात येईल. स्पर्धेसाठी सफेद चेंडू वापरण्यात येईल. स्पर्धेतील सहभागी संघांना आयोजकांतर्फे गणवेश देण्यात येईल. स्पर्धा 01/01/1997 ते 01/01/2007 या वयोगटातील खेळाडुंसाठी असेल.प्रत्येक संघ 16 खेळाडुंचा असेल. सहभागी संघ आरपीएल-21 या पहिल्या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या त्यांच्या संघामधील 6 खेळाडु (वयाची अट सांभाळुन) कायम ठेवू शकतात. उर्वरित 8 खेळाडु लिलाव पध्तीने घ्यायचे आहेत.
उर्वरित 2 खेळाडु बाद फेरी स्पर्धा संपल्यानंतर प्रत्येक संघाला आयोजकांकडुन देण्यात येतील. लिलाव प्रक्रियेत बोली न लागलेल्या खेळाडुंची बाद फेरीची स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. बाद फेरीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करणार्या काही खेळाडुंचा मुख्य स्पर्धेच्या संघांमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक आयोजकांना परवानगी नेमण्याची मुभा संघ मालकांना देण्यात येणार आहे. मात्र प्रशिक्षक हे रायगड जिल्ह्यातील असावेत अशी आयोजकांची अट असेल. प्रत्येक संघ मालकाने स्वतः च्या संघाचे एकत्रित सराव शिबीर आयोजित करणे गरजेचे आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडुंनी पुढील काही दिवसात ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची माहिती आयोजकांनी दिली.