जंजिरा, सह्याद्री, रायगड, कुलाबा उपांत्यफेरीत
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील आरसीएफच्या मैदानावर सुरू असलेल्या पंचवीस वर्षांखालील मुलांच्या रायगड प्रीमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत सह्याद्री चॅम्पिन्स, रायगड वॉरियर्स, कुलाबा स्ट्रॅकर्स, जंजिरा चायलेंजर्स संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.
साखळी फेरीचे सामने संपल्यानंतर अंतिम पॉईंट्स टेबल वर सचिन राऊळ संघ मालक असलेल्या जंजिरा चायलेंजर्स संघांनी सर्व सामने जिंकून नंबर एकवर राहण्याचा मान मिळवला आहे. सुरेंद्र भातिकारे यांचा सह्याद्री चॅम्पिन्स संघ दुसर्या स्थानावर आहे. खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे यांचा रायगड वॉरियर्स संघ तिसर्या तर अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा कुलाबा स्ट्रॅकर्स संघ चौथ्या क्रमांकावर राहून उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना सह्याद्री चॅम्पिन्स विरुद्ध रायगड वॉरियर्स यांच्यात तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना कुलाबा स्ट्रॅकर्स विरुद्ध जंजिरा चायलेंजर्स ह्या दोन संघांमध्ये रंगणार आहे.आरसीएफच्या सूसज्ज असलेल्या मैदानावर लेदर बॉल टी-20 क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील क्रिकेट रसिक गर्दी करतांना दिसत आहेत. ड्रिम्स क्रिकेट युट्युब चॅनल वर संपूर्ण स्पर्धा लाईव्ह दिसणार आहे, तर क्रिकहिरोज स्कॉरिंग अँप वर सुद्धा बॉल टू बॉल लाईव्ह स्कॉर दिसणार आहे. रायगड जिल्ह्यातील लेदर बॉल क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी व जिल्ह्यातील युवा व होतकरु क्रिकेटपटूना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी उपलब्ध व्हावी ह्या उद्देशाने रायगड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात असल्याची माहिती आरपीएलचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक यांनी प्रसार माध्यमांना दिली.