रायगड प्रीमियर लिगचा मानकरी उंबरखिंड फाईटर्स

। नेरळ । प्रतिनिधी ।
प्रीमियर लिग समिती आयोजित साखळी पद्धतीने खेळविल्या गेलेल्या व्यवसायिक क्रिकेट संघांच्या क्रिकेट स्पर्धा उंबरखिंड फाईटर्स संघ अंतिम विजयी संघ ठरला आहे. या स्पर्धेतून बीसीसीआयच्या महाराष्ट्र पश्‍चिम विभाग क्रिकेट स्पर्धेसाठी चार खेळाडूंची निवड झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण येथील जेएनपीटीच्या मैदानावर एक महिना रंगलेल्या व्यवसायीक खेळाडूंच्या रायगड जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित 32 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा अंतिम सामना उंबरखिंड फाईटर्स आणि जंजिरा चॅलेंजर्स दोन संघामध्ये जेएनपीटीच्या सुज्जज असलेल्या क्रीडांगणावर खेळला गेला.शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात वरुण ठक्कर या खेळाडूने खणखणीत चौकार मारून उंबरखिंड फाईटर्स संघाला विजय मिळवुन दिला आणि रायगड प्रीमियर लीग स्पर्धा जिंकून दिली.
अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून प्रशांत माळी, सुरेश म्हात्रे गुणलेखक सनी म्हात्रे, सामना अधिकारी म्हणून महेंद्र भातिकरे यांनी काम पाहिले .स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून चैतन्य पाटील तर उत्कृष्ट गोलंदाज ऋषभ भुजबळ, उत्कृष्ट फलंदाज निकुंज विठलानी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चैतन्य पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक विजयता उंबरखिंड फाईटर्स संघाला 80 हजार रुपये व आकर्षक चषक तर उपविजेता जंजिरा चॅलेंजर्स संघाला 70 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version