। रायगड । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता शिक्षकांना उन्हाळा सुट्टी लागणार आहे. (दि.6) जूनपासून त्यांना सुटी लागली होती, पण निवडणुकीमुळे त्यांना कामावर यावे लागले होते. दरम्यान, (दि.15) जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गावरील शिक्षकांना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना या सुटीच्या काळात देखील शिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना नियमित शाळेत येण्याचे बंधन नाही, पण त्यांची परीक्षेच्या दृष्टीने त्यांच्या सोयीने पूर्वतयारी करून घ्यावी लागणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई अॅक्टनुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे 2010 पासून या आठ वर्गातील एकही विद्यार्थी नापास झाला नाही. पण, दहावी, बारावीनंतर शाळा सोडून देणार्यांची संख्या लक्षणीय राहिली. त्यांना उत्तीर्ण व्हावेच लागेल, अन्यथा पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे. परंतु, या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संबंधित विषय शिक्षकांनी उन्हाळा सुटीत उपचारात्मक अध्यापन करावे लागणार आहे. त्यासाठी दररोज शाळेत येण्याचे बंधन नाही.