राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत रायगडचा संघ विजेता

अंतिम सामन्यात रत्नागिरीला केले पराभूत
। रोहा । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेत रायगडाच्या दिव्यांग टीमने स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून विजेतेपद पटाकावून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोकला आहे.
रत्नागिरी दापैली येथील लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेत रायगडचा दिव्यांग संघ सहभागी होऊन सर्वोत्तम कामगिरी केली. या स्पर्धेत कोल्हापूर, अहमदनगर व रत्नागिरी आदी संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात रायगड संघाने प्रथम फलंदाजी करून रत्नागिरी संघासमोर 6 षटकांमध्ये 50 धावांचे आव्हान ठेवले होते. पत्युत्तरात रायगड संघाने रत्नागिरी संघाला 6 षटकांमध्ये 32 धावांवर ऑलआऊट केले आणि 18 धावांनी हा सामना जिंकत चषकावर आपले नाव कोरले.
दरम्यान, कोच मंगेश दळवी, टीम मॅनेजर विजय लाड म्हसळा, राजेंद्र कांबळे रोहा आणि साईनाथ पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली रायगडच्या संघाने ही अभूतपूर्व कामगिरी करून दाखविली. या स्पर्धेत शैलेश पाटील मालिकावीराचा मानकरी ठरला, तसेच कल्पेश ठाकूर, सहदेव बर्डे, विलास कदम, संदीप ठाकूर, ऋषिकेश येशपाटील यांनी भेदक गोलंदाजी, तर हितेश पाटील, कल्पेश ठाकूर, शैलेश पाटील व सहदेव बर्डे, ऋषिकेश पाटील यांनी उत्तम फलंदाजी केली. रायगडचा कर्णधार मंगेश जाधव उत्तम प्रकारे नेतृत्व करून संघाला विजयी मिळवून दिला.
या विजयात मंगेश जाधव कर्णधार नागोठणे, शैलेश पाटील उपकर्णधार अलिबाग, सहदेव बर्डे रोहा, हितेश पाटील अलिबाग, कल्पेश ठाकूर नागोठणे, ऋषिकेश येशपाटील रोहा, संदीप दगडू ठाकूर पांडपूर पेण, संदीप ठाकूर, आमटेम-पेण, विलास कदम, आपटा-पनवेल, मुकेश पिंगळे तळा-गैलवाडी, नितीन महाबळे रोहा, शकील उकये म्हसळा आदी खेळाडू सहभागी झाले होते. रायगडच्या दिव्यांग संघाने केलेल्या या कामगिरीबद्दल संपूर्ण रायगड जिल्ह्यातून या संघाचे अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

Exit mobile version