। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दुसरी राज्यस्तरीय अजिंक्यपद लाठी स्पर्धा सोलापूर येथे यशस्वी पार पडली. या स्पर्धेत रायगड संघाने 14 सुवर्ण पदक, 6 रौप्य पदक आणि कास्य पदक अशी नेत्रदिपक कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत पाचवे स्थानाचे चषक पटकावले. या स्पर्धेसाठी एकूण 15 जिल्ह्यातील 250 विद्यार्थी सहभागी झाले होते.
एकमलाठी मध्ये शिवम गुंजाळ सुवर्णपदक, देवदत्त पडवळ, हित म्हात्रे कास्यपदक, स्मृती म्हात्रे, साना तुळपुळे रौप्यपदक, स्नेहा मसाल कास्यपदक, द्वीयमलाठी मध्ये मल्हार गुंजाळ सुवर्ण पदक, प्रयेश मसाल रौप्यपदक, नम्रता चव्हाण, तमना पाटील रौप्यपदक, पंचम प्रकारामध्ये 14 वर्षी खालील मुलींमध्ये स्नेहा मसाल, स्मृती म्हात्रे, लावण्या भगत, साना तुळपुळे, नम्रता चव्हाण सुवर्णपदक, 12 वर्षी खालील मुलांमध्ये शिवम गुंजाळ, मल्हार गुंजाळ, प्रियेश मसाल, अंश म्हात्रे, देवदत्त पडवळ सुवणपदक, तसेच कटपवित्रा मध्ये शिव हिलम, अंश म्हात्रे सुवर्णपदक, हित म्हात्रे, तमना पाटील, लावण्या भगत कास्यपदक पटकाविले. या सर्व विजेत्यांचे लाठी असोसिएशन रायगडचे अध्यक्ष प्रमोद मसाल यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व मुलांना राष्ट्रीय पंच प्रियंका गुंजाळ तसेच राष्ट्रीय पंच शुभम नखाते, राष्ट्रीय पंच वेदांत सुर्व यांनी मार्गदर्शन केले.