आइस स्टॉक स्पर्धेत रायगड अव्वल; पदकांची लयलूट

। रसायनी । वार्ताहर ।

फोर्ट इंटरनॅशनल अकादमी पन्हाळा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय आइस स्टॉक या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमधून दोनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी विशेष उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक व चषक पटकावले. सदर स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूरमधील हातकणंगले मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांनी केले. तसेच कार्यक्रमात आइसस्टॉक स्पर्धेचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन  बाळासाहेब सरनाईक व फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्रिंसिपल आँचल शानबाग व इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर स्पर्धा ही आइस स्टॉक असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व आइस स्टॉक असोसिएशन ऑफ कोल्हापुर यांनी आयोजन केले होते. स्पर्धेमधे संपुर्ण नियोजन आइस स्टॉक महाराष्ट्र अध्यक्ष महेश राठोड व आंतरराष्ट्रीय चॅपियन व खेलो इंडिया सुवर्णपदक विजेते खेळाडू यश जाधव सरनाईक, सोमेश सर, संदेश सर इत्यादी रेफ्री टीम यांनी शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा पार पाडली.

महाराष्ट्र राज्य विजेत्या रायगड संघाच्या खेळाडूंची नावे
भूपेंद्र गायकवाड (रौप्यपदक), जयेश चोगले (रौप्यपदक), केदार खाँबे (रौप्यपदक), दीपक चलवाड़ी (रौप्यपदक), दीक्षा जैन (सुवर्णपदक), धनेशा शिंगोटे(सुवर्णपदक), प्रथमेश सातपुते (सुवर्णपदक), संस्कृती घरत (सुवर्णपदक), मृणाली धुमाळ (सुवर्णपदक), आयुष कांबळे (सुवर्णपदक), दिव्यांक कुंभार (सुवर्णपदक), आदित्या खंडिजोड (सुवर्णपदक).
Exit mobile version