| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग येथील आरसीएफच्या मैदानावर सुरू असलेल्या रायगड प्रीमियर लिग पंचवीस वर्षांखालील मुलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतल्या साखळी सामन्यात रायगड वॉरियर्स संघाचा सलामीच्या दमदार फलंदाज ओंकार गावडे याने खांदेरी-उंदेरी किंग्स संघा विरुद्ध खेळताना अवघ्या 56 चेंडूंचा सामना करत 11 षटकार व 9 चौकार ठोकत 124 धावा काढून स्पर्धेतील पाहिले शतक ठोकलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या रायगड वॉरियर्स संघांनी 20 षटकांमध्ये 3 गडी गमावत 237 धावा फलकावर लावल्या.
सलामीला आलेल्या ओंकार गावडेने 124 तर राहुल भोईरने 43 धावा केल्या, प्रत्युत्तर देतांना खांदेरी-उंदेरी किंग्स संघांनी 39.1 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 139 धावा फलकावर लावल्या. निकुंज विठलांनी 49 व साई भिल्लारे 48 वगळता कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. रायगड वॉरियर्स संघाकडून अजिंक्य रसाळ यांनी 3 तर भावेश सावंत, साहिल खानावकर,भावेश कुरुंगळे यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. रायगड वॉरियर्स संघाने सामना 98 धावांनी जिंकला.