12 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्यपदकांची कमाई
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई, वडाळा येथे दि. 28 ते 29 सप्टेंबर या कालावधीत राज्यस्तरीय बॅक प्रेस क्लासिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सब ज्युनिअर मुलींच्या स्पर्धेत बॉडी लाईन जिम खोपोलीची नंदिनी उपर ही सब जुनियर क्लासिक स्ट्राँग वुमन या किताबाची मानकरी ठरली. ज्युनिअर क्लासिक स्ट्राँग मॅन हा किताब संसारे जिमचा तन्मय पाटील याला मिळाला. तर, सिनियर इक्विप गट स्पर्धेत 105 किलो वजनी गटात पनवेलचा गणेश तोटे विजेता झाला. तसेच, या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडला पुरुष आणि महिला ज्युनिअर अशी दोन सांघिक विजेतेपद प्राप्त झाली आहेत. तर, क्लासिक स्पर्धेत सीनिअर आणि मास्टर पुरुषांचे उपविजेतेपद मिळाले आहे. याबद्दल पॉवरलिफ्टिंग अध्यक्ष गिरीश वेधक यांनी पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आनंद व्यक्त केला आहे.
या स्पर्धेत रायगड पॉवरलिफ्टिंगचे संघ प्रशिक्षक म्हणून अरुण पाटकर यांची आणि संघ व्यवस्थापक म्हणून सुभाष टेंबे यांची निवड झाली होती. सहाय्यक म्हणून संदीप कृष्णा पाटकर यांना जबाबदारी दिली होती. यास्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून 12 सुवर्ण, 9 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 28 पदके प्राप्त केली आहेत. या स्पर्धेतून निवडक खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात सहभागी होणार आहेत. खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबाबत त्यांचे प्रशिक्षक मार्गदर्शक यांचासुद्धा महत्त्वाचा वाटा आहे, असे मत संघटनेचे सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, खजिनदार राहुल गजरमल यांनी व्यक्त केले आहे.
इक्विप व क्लासिक स्पर्धा महिला
सुवर्णपदक - नंदिनी ऊपर (47 किलो गट), अरे शिंदे (52 किलो गट), गायत्री बडेकर (43 किलो गट).
रौप्यपदक - दिव्या महाडिक (43 किलो गट).
कांस्यपदक - लावण्या भगत (69 किलो गट), गार्गी मसूरकर (52 किलो गट), मयूरी अनगत (63 किलो गट).
इक्विप व क्लासिक स्पर्धा पुरुष
सुवर्णपदक- जाहिद कणेकर, हर्षल देशमुख, गणेश तोटे, साहिल पोरवाल, तन्मय पाटील, ओमकार जाधव, बबन झोरे, नितीन शेजवळ, दिनेश पवार.
रौप्य पदक- हनुमंत खरात, रितिक पोळ, दर्श पाटील, संस्कार सरदार, गणेश तोटे, रितिक पोळ, सचिन देशमुख, रमेश खरे.
कांस्यपदक- हर्षद देशमुख, विनय पाटील, आसिफ सय्यद, नागनाथ घरत.