। खोपोली । प्रतिनिधी ।
क्रीडा व युवक सेवासंचलनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन वडवळ येथील माध्यमिक विद्यालयात शासनाच्यावतीने करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेत खालापूर तालुक्यातील विविध वयोगटातील एकूण 45 पुरूष व महिला संघांनी सहभागी होऊन आपल्या सांघिक खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले. ही स्पर्धा 14, 17 व 19 वर्ष मुले व मुली या गटात खेळविल्या गेल्या. या स्पर्धेत विजेत्या व उपविजेता संघाना चषक देऊन गौरविण्यात आले. तर, विजेत्या संघाची रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षा शिवानी जंगम, तालुका क्रीडा समन्वय जगदीश मरागजे, आयोजक जितेंद्र सकपाळ, सरपंच ज्ञानेश्वर सुतार, राजेंद्र पाशीलकर, तानाजी चव्हाण, एम.डी. चाळके, मुख्याध्यापिका वैशाली गोळे, मुख्याध्यापक सुधाकर थळे, अनिल मरागजे आणि वडवळ ग्रामस्थांसह अनेक कबड्डीप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल
14 वर्ष मुलीः-
विजेता संघ- जनता विद्यालय, खोपोली.
उपविजेता संघ- जनता विद्यालय इंग्रजी माध्यम, मोहोपाडा.
14 वर्ष मुलेः-
विजेता संघ- चिलठण विद्यालय, चिलठण.
उपविजेता संघ- सह्याद्री विद्यालय, खोपोली.
17 वर्ष मुलीः-
विजेता संघ- जनता विद्यालय, खोपोली.
उपविजेता संघ- माध्यमिक विद्यालय, वडवळ.
17 वर्ष मुलेः-
विजेता संघ- जनता विद्यालय, खोपोली
उपविजेता- चिलठण विद्यालय, चिलठण.
19 वर्ष मुलीः-
विजेता संघ- जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, खोपोली.
उपविजेता- छत्रपती विद्यालय, वावोशी.
19 वर्ष मुलेः-
विजेता संघ- छत्रपती विद्यालय, वावोशी.
उपविजेता संघ- जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय, खोपोली.