। नेरळ । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून मनसे रायगड चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट रजनीमध्ये जिल्ह्यातील 32 संघांचा समावेश होता. या स्पर्धेचे विजेतेपद रायगड इलेव्हन संघाने तर नेरळ इलेव्हन संघ उपविजेता ठरला. दरम्यान, या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील आदिवासी शाळांना संगणक वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण रायगड जिल्हा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कर्जत तालुक्यातील कोषाणे येथील मैदानावर करण्यात आले होते. ही क्रिकेट स्पर्धा चार दिवस चालली. या स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे नेते मा.आ.नितीन सरदेसाई यांच्या हस्ते झाले होते. तर स्पर्धेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील अनेक कार्यकर्ते नेते यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत रायगड इलेव्हन आणि कर्जत तालुक्यातील नेरळ इलेव्हन या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात अनुभवाच्या जोरावर रायगड इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावत मनसे रायगड जिल्हा चषक आणि रोख दोन लाख रकमेचे पारितोषिक पटकावले. तर नेरळ इलेव्हन हा स्थानिक संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचा तिसरा क्रमांक कल्याण येथील कुंदे संघ तर चौथा क्रमांक अंबरनाथ वांगणी येथील ढवळेपाडा संघ याने पटकावला .स्पर्धेसाठी मनसेच्या कर्जत तालुका टीमने चार रात्र सामने यशस्वी होण्यासाठी यशस्वी नियोजन केले होते.