रायगड जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेसाठी निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया गुरुवारी (दि.28) डॉ. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेतील 66 मतदार संघाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

यामध्ये पनवेल तालुक्यातील वावंजे नामप्र महिला, नेरे नामप्र, विचुंबे अनुसूचित जाती महिला, वावेघर व पळस्पे अनुसूचित जमाती, गव्हाण व केळवणे नामप्र महिला, कर्जत तालुक्यातील नेरळ नामप्र, सावेळे व बीड बुद्रुक सर्वसाधारण, खालापूर तालुक्यातील रिसमध्ये अनुसूचित जाती, सावरोली नामप्र महिला, आत्करगाव सर्वसाधारण महिला, सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा सर्वसाधारण महिला, पेण तालुक्यात जिते, दादर, वढाव, वडखळमध्ये सर्वसाधारण महिला, पाबळ नामप्र महिला, उरण तालुक्यातील चिरनेर अनुसूचित जमाती, नवघर सर्वसाधारण महिला, चाणजे अनुसूचित जाती महिला, बांधपाडा नामप्र, अलिबाग तालुक्यात शहापूर अनुसूचित जमाती, कुर्डूस नामप्र महिला, मापगाव नामप्र, थळ नामप्र, चौल सर्वसाधारण महिला, बेलोशी नामप्र महिला, मुरुड तालुक्यातील उसरोली सर्वसाधारण महिला, राजपुरी नामप्र, रोहा तालुक्यात नागोठणे, आंबेवाडी, निडी तर्फे अष्टमी सर्वसाधारण महिला, वरसे अनुसूचित जमाती, तळा तालुक्यात महागाव नामप्र, मांदाड अनुसूचित जमाती महिला, माणगाव तालुक्यात तळाशेत व लोणेरे अनुसूचित जमाती महिला, गोरेगाव सर्वसाधारण महिला, श्रीवर्धन तालुक्यात बोर्लीपंचतन नामप्र, बागमांडला नामप्र महिला, महाड तालुक्यातील बिरवाडी अनुसूचित जमाती, वरंध सर्वसाधारण महिला, नाते अनुसूचित जमाती महिला, वहूर नामप्र, पोलादपुर तालुक्यातील देवळे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

तर सर्वसाधारणसाठी पनवेल तालुक्यातील पाली देवद, वडघर. कर्जत तालुक्यातील कळंब, पाथरज, उमरोली, खालापूरमधील हाळखुर्द, चौक, सुधागड तालुक्यातील राबगाव तर पेण तालुक्यातील एकमेव शिहू मतदारसंघ, उरण तालुक्यातील जासई, अलिबाग तालुक्यातील कामार्ले, चेंढरे, रोहा तालुक्यातील धाटाव तर माणगाव तालुक्यातील निजामपूर, मोर्बा, म्हसळा तालुक्यातील पाभरे, वरवठणे हे दोन्ही मतदारसंघ त्याचप्रमाणे महाडमधील करंजाडे, पोलादपूरमधील लोहारे हे मतदारसंघ सर्वसाधारण जागांसाठी आरक्षित आहेत.

Exit mobile version