रायगडसह कोकणात जोरदार पावसाचा इशारा
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
येत्या 3-4 तासांत सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.दि.05 जुलै 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता जारी करण्यात आलेल्या चेतावणीनुसार पुढील 3-4 तासांत सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.