रायगडचा महेश ठरला ‘गोल्डन बॉय’

पॉवरलिफ्टिंगमध्ये पटकाविले सुवर्णपदक

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगडच्या महेश कृष्णा पाटील न्यूझीलंड येथील ऑकलंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालत नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेत मास्टर (40 वर्षांवरील) 59 किलो वजनी गटात स्कॉट, बेंचप्रेस आणि डेड लिफ्ट या प्रकारात 360 किलो वजन उचलून महेशने सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

भारतीय संघात रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारा पॉवरलिफ्टींग खेळाडू महेश हा खालापूर तालुक्यातील आपटी गावचा रहिवासी आहे. या आपल्या कामगिरीबाबत महेश पाटील यांनी याचे श्रेय रायगड पॉवरलिफ्टींग संघटनेस दिले आहे. तसेच भारतीय संघात निवड झाल्यानंतर वेळोवळी महाराष्ट्र असोसिएशनचे सेक्रेटरी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन मोलाचे झाले, असे भ्रमणध्वनीवर बोलताना त्याने सांगितले. महेश पाटील याच्या सुवर्ण यशाबद्दल रायगडचे अरुण पाटकर, गिरीष वेदक, सचिन भालेराव, राहुल गजरमल, संदीप पाटकर, माधव पंडित आणि यशवंत मोकल यांनी आनंद व्यक्त केला आहे. याहीपुढे असेच यश अनेक पॉवरलिफ्टिंग खेळाडू पुढील काळात प्राप्त करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version