| नेरळ | प्रतिनिधी |
जागतिक युवा पॉवरलिफ्टींग स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या अमृता भगत हिचे बुधवारी कर्जतमध्ये मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
मुंबईयेथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमृताचे स्वागत करण्यासाठी भारतीय पॉवरलिफ्टींग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. तिचे सायंकाळी कर्जत तालुक्यातील शेलु येथे आगमन झाले. त्यावेळी कर्जत तालुक्यातील असंख्य तरुण आणि नागरिक उपस्थित होते. शेलू येथे ग्रामस्थांनी अमृताच्या स्वागतासाठी बँड पथक सज्ज ठेवले होते, सोबत शेकडो महिला या सहभागी झाल्या होत्या. शेलू स्थानकातील पादचारी पुलावर अमृता आणि तिची आई या दोघींची भेट झाली. त्यानंतर तिरंगा फुग्यांनी सजवलेल्या रथामध्ये अमृता आणि तिचे प्रशिक्षक यांना बसविण्यात आले. त्या रथाच्या पुढे असंख्य लोक या विजयी मिरवणुकीत सहभागी झाले होते.