रायगडच्या समृद्धी कांबळेची महाराष्ट्राच्या संघात निवड

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगडची समृद्धी कांबळे हिची महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे रांची येथे १५ वर्षांखालील मुलींची स्पर्धा २६ डिसेंबरोपासून खेळावली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आपला १५ वर्षांखालील मुलींचा संघ निवडाला. त्यात रायगडच्या समृद्धी कांबळेचा समावेश आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे खेळविण्यात आलेल्या १५ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत समृद्धी कांबळे हिने अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे तिची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली आहे.

रायगडच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघाच्या व्यवस्थापक व प्रशिक्षक सौ. मनीषा अडबड यांनी समृद्धी कांबळे हिला प्रशिक्षण दिले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते व सर्व सदस्यांनी समृद्धी कांबळेचे अभिनंदन केले. 

Exit mobile version