रायगडचा सुपुत्र करणार भारताचे प्रतिनिधित्व

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी कुणाल पिंगळे जाणार मलेशियात

| अलिबाग | वार्ताहर |

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू रायगडचा कुणाल पिंगळे (लोखंडे जिम, खोपोली) याची निवड एशियन पॉवरलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 10 ते 18 डिसेंबरदरम्यान बहारू (मलेशिया) या ठिकाणी होणार आहे. 53 किलो वजनी गटाच्या जुनियर स्पर्धेत कुणाल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या स्पर्धेसाठी कुणाल पिंगळे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मुंबईहून रवाना झाला. कुणाल पिंगळे आणि त्याचे जिम संचालक प्रतीक लोखंडे (खोपोली) यांचे पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग सचिव, आंतरराष्ट्रीय पंच, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, दत्तात्रेय मोरे, माधव पंडित, संदीप पाटकर, सुभाष टेंबे, मानस कुंटे यांनी कुणाल पिंगळेला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version