राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत रायगडची बाजी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कोल्हापूर येथे नुकतीच राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जय शोतोकान कराटे अँड स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 8 कांस्य अशी एकूण 17 पदके मिळविली. या स्पर्धेत रायगडसह पुण्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील संदीप भोईर, पुणे येथील तनिष्का चत्तर, अपूर्वा काटोरे, काव्या शेळके यांनी सुवर्ण पदक मिळविले.

अलिबागमधील दिया मुनेकर, पेढांबेमधील तन्मई पाटील, नांदाईपाडा येथील अर्णव कोळी, पुणे येथील तनुश्री पासुपूळेती यांनी रौप्य, श्रेयश अजितकुमार ताथवडे यांनी कांस्य पद मिळविले. या खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून खेळामध्ये प्राविण्य मिळवले. दरम्यान काजल पाटील यांचा उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला. कराटे संघटनेचे राष्ट्रीय पंच संतोष कवळे यांनादेखील उत्कृष्ट पंच म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. जय शोतोकान कराटे अ‍ॅण्ड स्पोर्ट अकॅडमी या संस्थेला तृतीय क्रमांकाचे चषक देऊन सन्मानित करण्यात आले

Exit mobile version