। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमध्ये राहणाऱ्या रेल्वेच्या मोटरमनला 55 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. सदर रेल्वेच्या मोटरमनला फेसबुकवर शेअर मार्केट संबंधीची जाहिरात दिसली. त्यांनी जाहिरातीतील लिंक उघडली असता त्यांना देशाबाहेरील नंबरवरून फोन येणे सुरू झाले. त्या व्यक्तींकडून ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करून अधिकाधिक नफ्याचे आमिष सांगण्यात आले. त्याला भुलून मोटरमनने 55 लाख 67 हजार रुपये अज्ञाताच्या बँक खात्यावर पाठवले होते. मात्र, त्यांना सतत तोटा झाल्याचे सांगून पैशांची मागणी होऊ लागली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.







