| पनवेल | प्रतिनिधी |
प्रवासादरम्यान रेल्वेत विसरलेली बॅग चोरट्यांच्या हाती लागण्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन संबंधितांना परत केली आहे. यामध्ये दीड लाखाचे दागिने होते. तळोजा येथे राहणाऱ्या अरविंद चौधरी यांच्यासोबत हा प्रकार घडला. पत्नीसह ते प्रवास करत असताना त्यांची एक बॅग रेल्वेतच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना कळवले असता, घणसोली स्थानकात उपस्थित असलेल्या जी.डी. काशीद यांनी तातडीने त्या लोकलच्या डब्यातून बॅग ताब्यात घेतली. रेल्वेत नेहमीच अशा घटना घडतात. मात्र, यावेळी ही बॅग चोरट्यांच्या हाती लागण्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी ती संबंधितांना मिळवून दिली.







