वेस्ट इंडिज टी-20 विश्वचषकामधून बाहेर
| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |
यजमान वेस्ट इंडिज टी-20 विश्वचषकामधून बाहेर पडला आहे. या सुपर-8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार त्यांचा तीन गडी राखून पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 135 धावा केल्या. मात्र, पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला 123 धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर आफ्रिकेने विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. दक्षिण आफ्रिकेपूर्वी इंग्लंडचा संघही उपांत्य फेरीत पोहोचला आहे. जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन षटकांनंतर 2 बाद 15 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबवावा लागला. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानुसार 17 षटकांत 123 धावा करण्याचे नवे लक्ष्य मिळाले आहे. पावसामुळे तीन षटके कमी करावी लागली. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने सर्वाधिक 29 धावा केल्या. हेनरिक क्लासेन आणि एडन मॅक्रॅम यांनीही चांगली सुरुवात केली, पण त्याला मोठ्या डावात रूपांतरित करता आले नाही. क्लासेनने 22 आणि मॅक्रॅमने 18 धावांचे योगदान दिले .तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 135 धावा केल्या. संघाची सुरुवात खूपच खराब झाली. साई होप खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर निकोलस पुरनही 1 धावा काढून बाद झाला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ अडचणीत सापडलेला दिसत होता. यानंतर काईल मेयर्स आणि रोस्टन चेस यांनी काही काळ मैदानात टिकून राहण्याचा प्रयत्न केला. रोस्टन चेसने शामदार अर्धशतक झळकावले. त्याने 42 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांसह 52 धावा केल्या. 35 धावा केल्यानंतर मेयर्स शम्सीचा बळी ठरला. आंद्रे रसेलने 15 धावांचे योगदान दिले. अल्झारी जोसेफने 11 धावा केल्या. रोस्टन चेसच्या खेळीमुळेच वेस्ट इंडिजचा संघ सन्मानजनक धावसंख्या गाठू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने 4 षटकांत 27 धावा देत तीन बळी घेतले.