राज्यात वरुणराजाचे जोरात कमबॅक

मुंबई | प्रतिनिधी |
विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दडी मारल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकर्‍याला मोठा दिलासा
पावसाचे राज्यात दमदार कमबॅक झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुफान पाऊस झाला आहे. परभणी, नांदेड, अकोला, वर्धा, भंडार्‍यामध्ये तुफान पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभरानंतर पाऊस बसरला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यावर दुबार पेरणीची वेळ आली होती. पण या पावसाने शेतकर्‍याला मोठा दिलासा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version